By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांच्या पार्थिवावर त्यांची कन्या बासुंरी हिच्याकडून अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. सुषमा स्वराज्य यांच्या पार्थिवावर 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . शासकीय इतमामात लोधी रोडवरील शवदाहगृहात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांची कन्या बासुरी स्वराज्य व पती कौशल यांना अश्रु अनावर झाले.
सुषमा स्वराज्य यांच्या अंत्यविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आदि मान्यवर नेते उपस्थित होते.
तत्पूर्वी सुषमा स्वराज्य यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले होते. यावेळी भाजपाच्या मुख्यालयात पार्टीचा झेंडा अर्धा झुकविण्यात आला. स्वराज्य यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी , माजी पंतप्रधान मनमोहन सिंह , कॉंग्रेस नेते राजीव शुक्ल, दिग्विजय सिंह आदि उपस्थित होते.
कलम 370 रद्द केल्यानंतर प्रथमच जम्मू आणि काश्मीर मध्ये देशाचा तिरंगा ध्वज ....
अधिक वाचा