ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती, दुसऱ्याच दिवशी आयएएस अधिकारी निलंबित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 10:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती, दुसऱ्याच दिवशी आयएएस अधिकारी निलंबित

शहर : bhubaneswar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेणं एका अधिकाऱ्याला भलतंच महागात पडलंय. संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यासाठी निवडणूक आयोगानं ओडिशाच्या जनरल पर्यवेक्षकाला १७ एप्रिल रोजी निलंबित करण्याचे आदेश दिलेत. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार, कर्नाटक कॅडरचे १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी मोहम्मद मोहिसन यांना निलंबित करण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचं पालन करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांच्या अहवालाच्या आधारावर आयोगानं संबलपूरच्या जनरल पर्यवेक्षकांवर ही कारवाई करण्यात आलीय. मंगळवारी १६ एप्रिल रोजी मोदींच्या हॅलीकॉप्टरची झडती घेण्यात आली होती.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, संबलपूरमध्ये झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅलिकॉप्टरची चौकशी करणं निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येत नाही. एप्रिल २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निर्देशानुसार, एसपीजी सुरक्षा प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना अशा झाडाझडतीतून सूट प्राप्त होते.मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगानं उपनिवडणूक आयुक्त धर्मेंद्र शर्मा यांना संबलपूरला धाडलंय. पंतप्रधानांशी निगडीत या प्रकरणाची विस्तृत चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत. उल्लेखनीय म्हणजे, निवडणूक आयोगाच्या एका टीमनं मंगळवारी एका रोड शोसाठी राउरकेलामध्ये आलेल्या बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरचीही झाडाझडती घेतली होती. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पटनायक यांनी चौकशी करणाऱ्या टीमला पूर्ण सहकार्य केलं. चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते हेलिकॉप्टरच्या आतच बसून राहिले.

मागे

सातार्‍यात मोदी आणि शहा यांच्या राज ठाकरे पुन्हा बरसले
सातार्‍यात मोदी आणि शहा यांच्या राज ठाकरे पुन्हा बरसले

नांदेड, सोलापूर, इचलकरंजीनंतर राज ठाकरे यांची सातार्‍यात जाहीर सभा आहे. या....

अधिक वाचा

पुढे  

राहुल शेवाळेंविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार- खासदार सुप्रिया सुळे
राहुल शेवाळेंविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार- खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्....

Read more