ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी  प्रेरणादायी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी  प्रेरणादायी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

शहर : मुंबई

 स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृतीचे मुर्तीमंत रुप होते. त्यामुळे त्यांचे जीवन हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ते अभ्यासण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेतअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

 स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाच्या 126 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रकवि रामधारी सिंह ‘दिनकर’ मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रप्रेम उत्सव’ या निमंत्रितांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या कलिना प्रांगणात बुधवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. 

 राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. तसेच उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले, 'भारतीय संस्कृतीची महत्ता स्वामी विवेकानंद यांनी साता-समुद्रापार पोहचवली. आपल्या भाषणाने त्यांनी अमेरिकेतील नागरिकांचीही जिंकली.  त्यांनी आपल्या विद्वत्तेने सर्वोच्च स्थान पटकाविले होते. त्यांनी केवळ ज्ञानोपासनाच नाहीतर शरीर स्वास्थ्याबाबतही योग साधनेचे महत्त्व जगभर पोहचविले. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून शाळारुग्णालयांचीही स्थापना केली. या विविध सेवांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या अस्मितेचे जतन केले. त्यामुळेच स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि कार्य अनेक रुपांनी प्रेरणादायी आहे. ते अभ्यासणे तरुणांसाठी प्रेरणादायीच ठरेल.'

 उत्सवात ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनावर निर्माते-दिग्दर्शक मुजीब खान यांनी नाटक सादर केले. कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकरप्र- कुलगुरू रविंद्र कुलकर्णीराष्ट्रकवि रामधारी सिंह 'दिनकरमेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष नीरज कुमारडॉ. सुभाष चंद्र रायआर.पी. सिंहरामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी सत्यदेवानंद , हिंदी विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख प्रा.रतनकुमार पांडेप्रकाश सीलमआदी उपस्थित होते.

 

मागे

राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, ....

अधिक वाचा

पुढे  

पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर
पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14&....

Read more