By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 03:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
स्विस सरकारच्या निर्देशानुसार तेथील बँकांनी भारतीयांच्या खात्याबाबतचा डाटा एकत्रित करून भारताला सुपूर्द केला आहे. स्वयंचलीत माहिती आदान प्रदान व्यवस्थेनुसार पहिल्या टप्प्यात स्विसने दिलेल्या माहितीच्या विश्लेषणाची तयारीही भारताने सुरू केली आहे.
काही लोकांनी कारवाईच्या भीतीने स्विस बँकातील खाती गोठवली होती. आता स्विस बँकांकडुन मिळालेल्या माहितीमध्ये खातेधारकांची ओळख पटविण्यासाठीच्या आवश्यक बाबी अंतर्भूत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक रहस्ये उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्विस बँकेची खाती आणि त्यात बड्या लोकांनी जमा केलेला पैसा ह्या मुद्यावर बाबा रामदेव आणि भाजप पक्षाने 2014 च्या सुमारास प्रचंड वादळ उभे केले होते.त्याचबरोबर जेष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनीही विदेशातील काळा पैसा भारतात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता . त्या मुद्यावर 2014 ची निवडणूकही भाजपने जिंकली. दिल्लीत सत्तेत आल्यानंतर काही काळ स्विस बँकेतील पैसे ह्या मुद्द्यावर काहीच हालचाल दिसून येत नव्हती. त्यामुळे आता मोदी सरकारच्या दुसर्या टप्प्याच्या प्रारंभीच्या काळातच ही माहिती मिळाली आहे. आशा आहे की, ह्या महितीतून देशाला काही उपयुक्त अशा बाबी समोर याव्यात. अन्यथा मोदी सरकारला काळा पैसा नोटाबंदीतून मिळाला नाही. त्यात आता स्विस बँकेतूनही नाही मिळाल्यास नरेंद्र मोदी यांची पुढील निवडणुकांत कसोटी लागण्याची शक्यता जास्त आहे.
लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बह....
अधिक वाचा