By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या दहा दिवसांत राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात आशिष शेलारांनी म्हटलंय की, राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून १० दिवसांत अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असून त्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील अस्थिरतेचा फायदा गुन्हेगारांनी उचलला नाही ना? तसेच सरकार स्थापन होऊन खाते वाटप झाले नाही. जबाबादाऱ्या निश्चित झाल्या नाहीत, त्यामुळे पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावेत असं चित्र सध्या राज्यात दिसते असा आरोप करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी....
अधिक वाचा