By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 11:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीने सोलापूरातील बार्शीजवळील शेलगाव होळे परिसरात एका तरुणाला उडवलं आहे. यामध्ये त्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांच्या गाडीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
श्याम होळे असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. गाडीमध्ये तानाजी सावंत यांचे नातेवाईक होते. अपघात कोणाला समजू नये म्हणून तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीची नंबर प्लेट काढून ठेवली असे स्थानिकानी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून उमेद....
अधिक वाचा