ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या भाजपाला धडा शिकवा

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 08:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या भाजपाला धडा शिकवा

शहर : मुंबई

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  व्यासपिठावर मतांसाठी छत्रपती शिवरायांचा जयजयकार करायचा आणि प्रत्यक्षात शिवरायांचा अवमान करायचा ही भाजपाची दुहेरी निती असून शिवभक्त जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते वैजनाथ सोळंके यांनी केले.

शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळख असणारे तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके यांनी भाजपच्या सापत्न वागणूक आणि विकास करण्यात अपयशी ठरलेल्या नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. सध्या ते धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत असून त्यांना त्यांच्या जुन्या शिवसैनीक सहकार्‍यांचीही मोठी साथ मिळत आहे. 

मोदींच्या आजच्या परळीच्या सभेत शिवरायांच्या घोषणांचा जयजयकार करण्यात आला मात्र यांचेच भाजपाचे सरकार दुसरीकडे चौथीच्या पाठ्य पुस्तकातून शिवरायांचा इतिहास मिटवून टाकण्याचे काम करत आहेत. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारक झाले नाही, शिवरांयाच्या नावाने केलेली कर्जमाफी फसवी ठरली. अशा फसव्या सरकारला जाब विचारण्याची आता वेळ आली असून येत्या  21 तारखेला भाजपा विरोधी मतदान करून यांना धडा शिकवा विकासाभिमूख नेतृत्व धनंजय मुंडे यांना विजयी करा असे आवाहन सोळंके यांनी केले आहे.

मागे

गुणवत्तेचा शैक्षणिक परळी पॅटर्न निर्माण करण्यासाठी गुरूजनांनी आशीर्वाद द्यावेत
गुणवत्तेचा शैक्षणिक परळी पॅटर्न निर्माण करण्यासाठी गुरूजनांनी आशीर्वाद द्यावेत

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- युती सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील शिक्षण व शिक्....

अधिक वाचा

पुढे  

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न 'बेटी पंकजा' पुर्ण करतेयं - पंतप्रधानांचे प्रशस्तीपत्र 
गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न 'बेटी पंकजा' पुर्ण करतेयं - पंतप्रधानांचे प्रशस्तीपत्र 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न "....

Read more