By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून जिल्ह्यात मतदानाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्याचमोठ्या रांगा आहेत. दरम्यान इस्लामपूर येथील साखराळे गावातील 63 क्रमांकाचा मतदान केंद्रातील मतदान यंत्र बिघाड झाल्याने 45 मिनिटे मतदान थांबले होते. मतदान यंत्र दुरुस्त केल्यावर 45 मिनिटांनी मतदान सुरू झाले.
विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २....
अधिक वाचा