ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बिहारमध्ये राजकीय भूकंप , लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 28, 2019 07:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बिहारमध्ये राजकीय भूकंप , लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का

शहर : देश

लोकसभा 2019 ची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस बाकी असतना बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बिहारमधील प्रमुख पक्ष राष्ट्रीय जनता दलमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. हा संघर्ष टोकाला गेल्याने लालू प्रसाद यांचे छोटे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत बंड पुकारले आहे. त्यामुळे राजदला मोठा झटका बसला आहे. लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव याने बंडाचे निशाण फडकावत राजदच्या विद्यार्थी विंगचा राजीनामा दिला आहे. तेजप्रतापने ट्विटरवरून याची घोषणा केली. महाआघाडीच्या जागावाटपाच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या तेजप्रतापने टोकाचे पाऊल उचल राजीनामा दिला. तेजप्रतापने राजदच्या विद्यार्थी विंगचा राजीनामा दिल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केले. मी राष्ट्रीय जनता दलाच्या संरक्षक पदाचा राजीनामा देत आहे. मला नादान समजणारे लोक नादान आहेत. कोण किती पाण्यामध्ये आहे याची मला सर्व माहिती आहे’, असे ट्विट तेजप्रतापने केले आहे.

तेजप्रताप यादव अनेक दिवसांपासून नाराज होते. लोकांच्या मागणीचा विचार केला जात नाही. जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न होत नाही. आपले पक्षात कोणीही ऐकत नाही. आपण दररोज लोकांना भेटतो. ते म्हणतात, शिक्षित आणि शिक्षक आहात. त्यामुळे लोकांच्या मागणीला आपले प्राधान्य आहे. त्यापासून मी मागे हटणार नाही, असे तेजप्रताप यांनी म्हटले. याआधी तेजप्रताप एक पत्रकार परिषद घेणार होते, परंतु ऐनवेळीस ती रद्द करण्यात आली.

दरम्यान, बंडाचे निशाणा फडकावलेल्या तेजप्रताप यांनी शिवहर आणि जहानाबाद येथून आपल्या उमेदवारांची घोषणा केली. शिवहर येथून अंगेश कुमार तर जहानाबात येथून चंद्र प्रकाश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात राजदमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा भाजप आणि आघाडीला होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

मागे

भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कापले, चक्क चौकीदाराकडे दिला राजीनामा
भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कापले, चक्क चौकीदाराकडे दिला राजीनामा

भाजपमध्ये चौकीदाराचे महत्त्व किती वाढले आहे याबाबतची ही बातमी. उत्तर प्रदे....

अधिक वाचा

पुढे  

मिलिंद देवरा यांनी आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
मिलिंद देवरा यांनी आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

मिलिंद देवरा यांनी आज मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडून अध्यक्ष पदाच....

Read more