By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2024 07:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
"वरळी डोम येथे उद्धव ठाकरे यांची काही कायदेपंडितांसोबत महापत्रकार परिषद आहे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. देशभरातील पत्रकारांना आम्ही निमंत्रित केलय" असं संजय राऊत म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री नाहीत. त्यात वाटेकरी आहेत, त्यावर त्यांनी बोलावं. राम मंदिरासंदर्भात शिवसेनेच योगदान काय आहे? हे जगातल्या प्रत्येक हिंदूला माहित आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस गोधडीत रांगत होते. राम मंदिरावर तुम्ही शिवसेनेला काय प्रश्न विचारता? त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही कुठे होता?” असं संजय राऊत म्हणाले. “डरपोक अयोध्येच मैदान सोडून पळून गेले. या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिराच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण ही संघनिती आहे, स्वत:ची नामर्दांनगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावर बोट ठेवण्यासारख आहे हा रामाचा अपमान आहे” असं संजय राऊत म्हणाले.
मातोश्रीबाहेर मोठा कांड होण्याची शक्यता असा फोन आलेला त्याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, “हे जे कोणी तरुण आहेत, काय आहेत, ते आम्हाला माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नाव धारण केली होती. लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणूक जिंकायची हे भाजपाच षडयंत्र आहे”
उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद कधी?
“ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्राच्या डाऊटफुल सरकारची नाही, ते सूडाने पेटलेले आहेत” असं संजय राऊत म्हणाले. “उद्या 4 वाजता वरळी डोम येथे उद्धव ठाकरे यांची काही कायदेपंडितांसोबत महापत्रकार पिरषद आहे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. देशभरातील पत्रकारांना आम्ही निमंत्रित केलय. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर तिथे चर्चा होईल” असं संजय राऊत म्हणाले.
केंद्र आणि राज्यात मजबूत सरकारची गरज आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात भार....
अधिक वाचा