ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी रुग्णवाहिका वळवली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी रुग्णवाहिका वळवली

शहर : नाशिक

मोदींच्या सभेनिमित्त काही रुग्णवाहिका दैनिक कामाच्या ठिकाणापासून दुसरीकडे वळविण्यात आल्या होत्या. चांदवड येथील आरोग्य केंद्रातील रुग्णाला रुग्णावाहिका देण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णाला नाशिक जिल्हा रुग्णालयात आणले. तसेच, रुग्णवाहिकेबाबत विचारले असता, संबंधित अधिकारी फोन घेत नाहीत आणि उडवाउडवीची उत्तरे देत, असल्याचं रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. तर, रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका घेण्यास नकार दिल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणुकांच्या प्रचारार्थ आज दिंडोरी येथे सभा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, सभास्थळावर तातडीची सेवा म्हणून रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्या आहेत. मोदींच्या सभेच्या एक दिवस अगोदर म्हणजे रविवारी रात्री चांदवड येथून एका रुग्णास नाशिक जिल्हा रुग्णालयात न्यायचे होते. त्यासाठी, रुग्णाच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र, रुग्णावाहिका मोदींच्या सभांच्या कामासाठी वळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करुन रुग्णाला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, उद्या होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी आज आम्हाला त्रास सहन करत असल्याचंही या नातेवाईकांनी म्हटलं आहे. 

चांदवड आरोग्य केंद्रातून रुग्णाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करायचे होते. 108 ला संपर्क केला, रुग्णवाहिका चांदवडची पिंपळगाव बसवन्त सभास्थळी होती. त्यामुळे रुग्णवाहिकेस विलंब होणार होता. मात्र, संपर्क होताच आम्ही पिंपळगाव येथून रुग्णवाहिका रवाना केली. त्यानंतर, संबंधित नातेवाईकाने रुग्णवाहिका डॉक्टरांसोबत बोलताना प्रतिसाद दिला नाही. तुमची गाडी नको, असे सांगून फोन कट केला. तरीही चांदवड आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका पोहचली.

सभेच्या ठिकाणी केवळ 4  रुग्णवाहिका सज्ज असून पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही 102 जननी शिशुश्री योजनेच्या रुग्णावाहिकाही रुग्ण आणि नागरिकांसाठी उपलब्ध केल्या आहेत.  

डॉ. आश्विन राघमवार, जिल्हा व्यवस्थापक, 108 सेवा.

 

मागे

निवडणूक आयोगाच्या नोटीसला प्रज्ञा सिंह यांचे उत्तर
निवडणूक आयोगाच्या नोटीसला प्रज्ञा सिंह यांचे उत्तर

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सि....

अधिक वाचा

पुढे  

विश्वासघातकी पवारांच्या किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा: मुख्यमंत्री
विश्वासघातकी पवारांच्या किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा: मुख्यमंत्री

शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील या....

Read more