ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीत २७ उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत.

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 11:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीत २७ उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत.

शहर : मुंबई

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीच्या वेळी  
१४ अर्ज बाद ठरले असून, त्यातील मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघातील १३ उमेदवारांचे अर्ज अपात्र  
ठरले आहेत. दक्षिण मध्य मुंबईत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संजय रमेश भालेराव यांचा अर्ज अपात्र ठरला  
आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून काल बुधवारी देण्यात आली. 
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदासंघासाठी ४४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांची छाननी बुधवारी सुरू झाली होती. 
त्यात १२ अर्ज बाद झाले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदासंघासाठी १७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून, 
छाननीनंतर दोन उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. 
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांत एकूण ११० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 
त्यापैकी छाननीत १३ अर्ज बाद ठरले आहेत. आता या चार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्यापैकी ९७ उमेदवार पात्र ठरलेले 
आहेत. यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवारांचा, मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) मतदारसंघात 
२२, ईशान्य मुंबई मतदारसंघात २८ आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात २२ उमेदवारांचा अर्ज वैध ठरला आहे. जर वैध 
ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज १२ एप्रिल २०१९ पर्यंत मागे घेता येणार आहेत. 

मागे

अमळनेरमध्ये भाजपाच्या सभेत जोरदार राडा
अमळनेरमध्ये भाजपाच्या सभेत जोरदार राडा

अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय ....

अधिक वाचा

पुढे  

चंद्रपूरमध्ये चक्क उमदेवारांने रांग तोडून केलं मतदान...
चंद्रपूरमध्ये चक्क उमदेवारांने रांग तोडून केलं मतदान...

 चंद्रपूरमध्ये चक्क उमदेवारांने रांग तोडून मतदान केलं... काँग्रेसचे लोकसभ....

Read more