ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पराभवाच्या भितीने पाया खालची वाळू घसरली - धनंजय मुंडे

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पराभवाच्या भितीने पाया खालची वाळू घसरली  - धनंजय मुंडे

शहर : मुंबई

पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा माणूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे पुण्य ज्याच्या पाठीशी आहे, त्यांचा असा उल्लेख करणार्‍यांचा परळीची जनता तिव्र शब्दात निषेध करू लागली आहे. 

शुक्रवार परळीत झालेल्या एका सभेत पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा दुष्ट राक्षस असा उल्लेख करत या राक्षसाच्या तोंडाला जॅमर बसवा, असे भाषण केले. हे भाषण ऐकुण उपस्थित भाजपा कार्यकर्ते ही अस्वस्थ होवून ताई हे काय बोलत आहेत असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले. अनेकांनी तेथेच अशा वक्तव्याची नाराजी व्यक्त केली. वर्तमानपत्रात आज या संबंधी बातम्या प्रसिध्द होताच शहरात संतापाची लाट उसळली असून, ताई पातळी सोडू नका असा वडीलकीचा सल्ला अनेकांनी त्यांना दिला आहे. 

परळीच्या जनतेसाठी तुम्ही भलेही विकास केला नसेल, मात्र सांगण्यासाठी काही नाही म्हणून विरोधकांना राक्षस म्हणणे ही कोणती संस्कृती ?  कोणते संस्कार ? स्व.गोपीनाथराव मुंडे हे आज हयातीत असते तर त्यांनाही हे आवडले नसते, एकीकडे धनंजय मुंडे आपल्या भाषणात ताईंविषयी बोलताना आमच्या बहिणबाई, आमच्या ताईसाहेब असा आदरार्थी उल्लेख करतात. दोन उमेदवारांमधील हा फरकही परळीकरांना आता दिसू लागला आहे.

मागे

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण म्हणून त्याला अडकवले जातेय?
मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण म्हणून त्याला अडकवले जातेय?

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या या सर्व धामधुम....

अधिक वाचा

पुढे  

कॉपी बहाद्दर भाजपाला स्वतःचा जाहीरनामा ही करता आला नाही - धनंजय मुंडे
कॉपी बहाद्दर भाजपाला स्वतःचा जाहीरनामा ही करता आला नाही - धनंजय मुंडे

विधानसभा निवडणूकीच्या संपूर्ण प्रचार कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने मा....

Read more