ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 23 किंवा 24 तारखेला

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 23 किंवा 24 तारखेला

शहर : मुंबई

           मुंबई -  महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबर पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवसआधी सहा मंत्र्यांचे तात्पुरते खातेवाटप 12 डिसेंबरला जाहीर झाले. मात्र, विस्तार कधी होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


           शिवसेनेच्या संभाव्य यादीत रामदास कदम, अनिल परब, सुनील प्रभू, दीपक केसरकर, उदय सामंत, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, आशीष जैस्वाल, संजय राठोड, सुहास कांदे या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेस मध्ये अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, सतेज पाटील, के. सी. पाडवी, विश्वाजीत कदम या आमदारांची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.  


          दरम्यान, राष्ट्रवादीत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धंनजय मुंडे, हसन मुश्रीफ, नवाब मालिक, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात मंत्रिमंडळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पुढे  

आमच्या सरकारने करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे - अमित शाह
आमच्या सरकारने करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे - अमित शाह

           नवी दिल्ली -  सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आं....

Read more