By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत १२५ विरुद्ध १०५ मतांनी मंजूर झाले. १९५५ मधील नागरिकत्व विधेयकात दुरुस्ती करण्यात आल्याने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या विविध ६ धर्मीय निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'केंद्र सरकार संवैधानिक सुरक्षा, भाषा, संस्कृती और असामची प्रादेशिक संस्कृती कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आज, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
The Central Government and I are totally committed to constitutionally safeguard the political, linguistic, cultural and land rights of the Assamese people as per the spirit of Clause 6.
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2019
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर मोदी यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याच्या भावना ट्विटवर द्वारे व्यक्त केल्या. बंधुभाव आणि दयेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले होते. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही अशी ग्वाही मी आसामच्या लोकांना देऊ इच्छितो. तुमची विशेष ओळख, अधिकार आणि संस्कृती कायम आणि अधिकाधिक समृद्ध होत राहील, असं मोदी म्हणाले.
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या द....
अधिक वाचा