By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 28, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आणि असं असताना आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. किरीट सोमय्या या मतदारसंघाच विद्यमान खासदार आहेत.एवढेच नव्हे तर उमेदवारीचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाण्याचीही तयारी केली होती. मात्र, मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्यात शेलक्या शब्दांत टीका केल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या नावाला जोरदार विरोध दर्शवला होता. परिणामी किरीट सोमय्या यांच्यापुढील अडचणी वाढल्या असून त्यांची पुरती कोंडी झाली आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेरठ येथून लोकसभा निवडणुकीचे रणश....
अधिक वाचा