ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभागाची केली चांगलीच कानउघाडणी

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभागाची केली चांगलीच  कानउघाडणी

शहर : मुंबई

प्राप्तिकर विभागाने ऐन निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि 
आंध्र प्रदेशात जे छापे टाकले आहेत त्यावर निवडणूक आयोगाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 
निवडणूक आयोगाने या कारवाईची दखल घेतली आहे. यावर निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभागाची चांगलीच 
कानउघाडणी केली आहे.   
तुम्हाला जर छापा टाकायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांना 
याची आधी पूर्वसूचना द्या, अशा शब्दात आयोगाने प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांच्या जवळच्या काही सहकाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. त्यावरुन  
सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात हे छापे टाकले जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 
काँग्रेसच्या तक्रारीनंतर आयोगाने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेवून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच 
कानउघाडणी केली आहे.
निवडणुकीच्या काळात कुठेही छापा टाकायचा असेल तर याची पूर्वसूचना निवडणूक आयोगाला देणे गरजेचे आहे, 
असे आयोगाने म्हटले आहे. मध्य प्रदेशात जी छापेमारी करण्यात आली त्यासंबंधीची पूर्वसूचना प्राप्तीकर विभागाने निवडणूक आयोगाला दिली नव्हती. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे आयोगाला छाप्यासंबंधीची माहिती असणे गरजेचे आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

'निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याचे सुरू असलेले छापे हे राजकीयदृष्ट्या निष्पक्ष आणि गैरप्रकार 
रोखण्यासाठीचे आहेत आणि ते असेच सुरूच ठेवले जातील,' महसूल सचिव, तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर 
मंडळाने निवडणूक आयोगाला अशी ग्वाही दिली आहे. 

मागे

महाआघडीचे उमेदवार आ. कुणाल पाटील अडकले वादाच्या भोवर्‍यात
महाआघडीचे उमेदवार आ. कुणाल पाटील अडकले वादाच्या भोवर्‍यात

धुळ्यातील महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या
शरद पवारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या

शरद पवार यांची सभा तब्बल 2 तास उशिराने सुरू झाल्याने त्यांच्या सभेतून लोक....

Read more