By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 24, 2020 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅप केले. त्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्त्रायलला गेले होते. त्यांनी तेथून आणलेला सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या तक्रारी आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणाचीही नव्याने चौकशी करण्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले आहेत. याबाबतीत बोलताना त्यांनी सांगितले की, कोरेगाव-भीमा प्रकरणाकडे संशयाने पहिले जात आहे. आमच्याकडे अशाप्रकारची अनेक निवेदने आली आहेत. भाजप विरोधात कुणीही विचार मांडले तर तिला अर्बन नक्सल म्हणायचे, अशी फडणवीस सरकारची भूमिका होती. त्यामुळे या सगळ्याची योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
ग्रीस - संसदेने बुधवारी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपत....
अधिक वाचा