By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
चेन्नई - त्रिचीमध्ये एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बनवले आहे. 50 वर्षाचा शेतकरी शंकर त्रिचीच्या इराकुडी गावात राहतो. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आपल्या स्वत:च्या पैशाने हे मंदिर तयार केले आहे. ज्या जमिनीवर शेतकऱ्याने मंदिर तयार केले आहे. ती जमिनही शेतकऱ्याची आहे.
शंकरकडे मंदिरासाठी पर्यायी पैसे नव्हते. त्यामुळे हे मंदिर तयार होण्यास आठ महिने लागले. मंदिराचा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी सफेद आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये एक मूर्ती दिसत आहे.
या मंदिराता मोदींशिवाय तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जयललिता, सध्याचे मुख्यमंत्री पलानीसामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही फोटो या मंदिरातील भिंतीवर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत.
शंकर आपल्या गावातील शतेकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. 2014 मध्ये ते पंतप्रधान मोदींचे मंदिर बनवण्याचे ठरवले. पण पैशांच्या अडचणीमुळे त्यावेळी मंदिर बनवू शकत नव्हते. शंकरने बनवलेल्या मूर्तीची उंची दोन फूट आहे.
मुंबई – ‘भारतमातेचा पुत्र, त्याला कोणत्याही भाषेचं बंधन नाही, ....
अधिक वाचा