By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
हेलसिंकी - फिनलँच्या सोशल डेमोक्रेट पार्टीने रविवारी पंतप्रधानपदासाठी 34 वर्षीय सना मरीन यांची निवड केली आहे. त्या फक्त देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. त्यांनी अँटि रिने यांची जागा घेतली आहे.
मरीन यांनी सांगितले की, आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला असल्याने खूप काम करावं लागेल. मी माझ्या वयाबद्दल किंवा महिला असल्याचा विचार केला नाही. काही कारणांनी मी राजकारणात आले आणि त्यासाठी मतदारांनी विश्वासही टाकला.
फिनलँडच्या राजकारणात 27 व्या वर्षी मरीन यांनी प्रवेश केला होता. 2014 मध्ये पक्षाची उपाध्यक्षही झाली. त्यानंतर 2019 मध्ये देशातील ट्रान्सपोर्ट आणि कम्यूनिकेशन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. अँटि रिनेच्या मंत्रिमंडळात त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मरीन पंतप्रधान झाल्या आहेत.
सर्वात कमी वयात पंतप्रधानपद सांभाळण्याचा मानही मरीन यांनी पटकावला आहे. न्यूझीलंडमध्ये जेकिंडा आर्डेन 39 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. युक्रेनमध्ये ओलेक्सी होन्चारुक 35 व्या वर्षी तर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनीही 35 व्या वर्षी देशाचं नेतृत्व स्वीकारलं होतं.
नवी दिल्ली - नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे सध्या मोठा निर्णय घेण्याची ....
अधिक वाचा