ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 25, 2020 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील

शहर : मुंबई

कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.

धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे. कोरोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीबाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील, असं जयंत पाटील म्हणाले. “राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही. पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असं जयंत पाटील यांनी अधोरेखित केलं.

राऊतांच्या मुलाखतीचं भाजप कौतुक कसं करेल?

संजय राऊतांच्या मुलाखतीचे भाजप कौतुक कसं करणार? सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरु ठेवाव्या लागतात. संख्या 105 असल्याने विरोधकांचा असा प्रयत्न आहे. मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री एकत्र भेटणं हा नित्याचा भाग आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न कशाला?

काँग्रेसवर अन्याय होत कामा नये. मुख्यमंत्री हे काँग्रेसशीदेखील चर्चा करत आहेत. काँग्रेसची नाराजी नाही. कालच आम्ही सगळे एकत्र होतो. अशोक चव्हाण नाराज नाहीत हे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. छोट्या-मोठ्या गोष्टी झाल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

पुढे  

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार
महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भा....

Read more