By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 08:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- युती सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील शिक्षण व शिक्षक अडचणीत सापडले असून शाळा, शिक्षण आणि शिक्षक वाचविण्यासाठी या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन शिक्षक आ.विक्रम काळे यांनी केले. तर गुणवत्तेचा शैक्षणिक परळी पॅटर्न निर्माण करण्यासाठी गुरूजनांनी आशीर्वाद द्यावेत परिवर्तनाच्या या लढाईत साथ द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
बुधवारी सायंकाळी येथील हालगे गार्डन सभागृहात आयोजित शिक्षक कार्यकर्ता मेळाव्यात श्री.काळे, श्री.मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री पंडितराव दौंड, डॉ.नरेंद्र काळे, ऍड.अनंतराव जगतकर, ऍड.विजयप्रकाश तोतला, सोमनाथअप्पा हालगे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संजय फड, प्रा.विनोद जगतकर, निवृत्तीराव भांगे, एस.ए.समद, साहेबराव फड, ऍड.जिवनराव देशमुख, भीमराव सातभाई, राजाभाऊ निर्मळ, अजय सोळंके, दिपक तांदळे, प्रा.वसंत कांबळे, प्रदिप खाडे, प्रा.शंकर कापसे, डी.जी.शिंदे, अजय जोशी, प्रा.सुनील चव्हाण, रमेश गित्ते, धिरज बाहेती, सय्यद सिद्दीकी, विलास आरगडे, संजय कराड, बालासाहेब हंगरगे, हंगे सर, खेत्रे सर, इंगळे सर, गुट्टे सर, अमोल कांबळे, राहुल ताटे यांच्यासह शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.काळे यावेळी म्हणाले, युती सरकारने राज्यातील शिक्षण, शाळा संपवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विनाअनूदानीत शाळांचा प्रश्न सुटलेला नाही. शिक्षक कर्मचारी भरती बंद करून बेरोजगार शिक्षीत बेरोजगार तरूणांच्या जिवनाशी या सरकारचा खेळ सुरू आहे. सरकारच्या धोरणामुळे राज्यात शिक्षण शाळा व शिक्षकांवरील संकट दुर करण्यासाठी या निवडणूकीत आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन आ.काळे यांनी केले.
परिवर्तनाच्या लढाईत साथ द्या - धनंजय मुंडे
युती सरकारच्या धोरणामुळे शिक्षण व्यवस्था देशोधडीला लागली आहे. शिक्षण व शिक्षकांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे शिक्षण व शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मांडले आहेत. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. या निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांनी परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिवर्तनाच्या लढाईत साथ द्या असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.
धनंजय मुंडे विकास करू शकणारे नेतृत्व - माजी मंत्री पंडितराव दौंड
परळी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याची धमक व इथल्या सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची ताकत धनंजय मुंडे या तरूण नेतृत्वामध्ये आहे. या निवडणूकीत धनंजय मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा असे आवाहन पंडितराव दौंड यांनी केले. प्रास्ताविक प्रा.सुनील चव्हाण यांनी केले तर प्रा.गुट्टे, दिपक तांदळे, वसंत कांबळे, प्रा.जगतकर आदींनी विचार मांडले.
जाहिरनाम्याचे प्रकाशन
परळी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या जाहिरनाम्याचे प्रकाशन आ.विक्रम काळे, पंडितराव दौंड, ऍड.जगतकर, डॉ.नरेंद्र काळे, बाजीराव धर्माधिकारी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सिरसाळा (प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथील सभेचा बंदो....
अधिक वाचा