By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नांदेड
देशात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाणांच्या प्रचार रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा बनवले आहे. ‘सर्वच चोरांचे नाव मोदी कसे काय असू शकते?’ असा सवाल राहुल गांधी यांनी मोदी यांना केला आहे.
पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून पळून गेलेला भामटा ‘नीरव मोदी’आणि आयपीएलचा माजी अध्यक्ष ‘ललित मोदी’ यांच्या यादीत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडले आहे. मात्र, राहुल यांच्या या टीकेनंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजप नेत्यांनी याप्रकरणी राहुल गांधी हे लोकांचा जातीवरुन अपमान करत असल्याची तक्रार केली.
अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात महाआघा....
अधिक वाचा