ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री विकासपुरुष,सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध - उदयनराजे भोसले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री विकासपुरुष,सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध  - उदयनराजे भोसले

शहर : सातारा

पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत सर्वाना धक्का दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कौतुक केले आहे. तर त्यांच्या पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे. उदयनराजे भोसले म्हणतात की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत. ही मैत्री पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडची असून, मागील पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली,’ असा आरोप त्यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

सत्तेसाठी लाईन लावून उभं राहणं माझ्या स्वभावात नाही, असं स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, राजकारणात माझी बांधिलकी कायम माझ्या मतदारसंघाशी राहणार आहे, त्यामुळे सत्ता असो नसो जनतेच्या सेवेत वाहून घेण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे भाजपाकडे सत्ता आहे म्हणून मी तिथं जाईन असा तर्क काढणं चुकीचं आहे. योग्य वेळी सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे, त्यामुळे आता कोणीही कसलेही तर्कवितर्क काढू नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मागे

महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल,५० विधानसभा जागा लढवण्याचा निर्धार
महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल,५० विधानसभा जागा लढवण्याचा निर्धार

वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल मा....

अधिक वाचा

पुढे  

अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख
अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

 माजी केंद्रीय अर्थ, माहिती व प्रसारण व वाणिज्य मंत्री अरुण जेटली यांच्य....

Read more