By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 06:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहेत. घाबरण्याचे कारण नाही. ताकदीने न्यायालयीन लढाई लढू, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे. शिवसेना आमदारांचा मुक्काम हॉटेल ललितमध्येच आहे. आपण मुंबईच्या बाहेर जायचे नाही. यापुढेही आपण मुंबईत ठाण मांडून राहायचे आहे, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदारांची बैठक हॉटेल ललितमध्ये झाली. यावेळी आमदारांनी शांत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शरद पवारांशी माझे बोलणे झाले आहे आणि आम्ही सर्व हालचालींवर सतत नजर ठेवत आहोत. तुमचा विश्वास गमावू नका. आपल्याला खात्री बाळगा आपण अजून संधी गमावलेली नाही. ३० तारखेला आम्ही भाजपाला बहुमत सिद्ध करु देणार नाही. सरकार फक्त आमचेच असेल. यावेळी, आपण सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना दिला
महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी म....
अधिक वाचा