By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - येत्या ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान भवनातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ३० डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरक्षेच्या कारणास्तव विधान भवनाचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात ९.५५ वाजण्यापूर्वी हजर राहावे, असं या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. नव्या ३६ मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा राज भवनाऐवजी विधान भवनात पार पडणार आहे.
३० डिसेंबरला होणाऱ्या या राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराला मंत्र्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, आमदार तसंच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं राज भवन ऐवजी विधान भवनात शपथविधी होणार आहे. ३० डिसेंबरला दुपारी १ वाजता हा शपथविधी होण्याची शक्यता आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.
महाविकासाघाडीच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे १० आमदार कॅबिनेट कर ३ मंत्री राज्यमंत्रीपदाशी शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे ही १० आमदार कॅबिनेट आणि ३ आमदार राज्यमंत्रीपाची शपथ घेणार आहेत. तर काँग्रेसचे ८ जण हे कॅबिनेट आणि २ जण राज्यमंत्रीपदाशी शपथ घेणार आहेत. याआधी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ मंत्र्यांचा शपथविधी झाला होता.
मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाल्यामुळे विरोधकांकडून चांगलीच टीका या सरकार होत होती. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने य़ावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. 'प्रश्न कोणाला विचारायचे हाच प्रश्न आहे', असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
केंद्र सरकारने कितीही प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालमध्ये डिट....
अधिक वाचा