By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 11:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : arakkonam
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी घोडेबाजाराला ऊत आलेला दिसतोय. तामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून डीएमके उमेदवाराच्या कार्यालयामधून मोठी रक्कम जप्त करण्यात आलीय. या घटनेनंतर या मतदारसंघातील निवडणूक रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमके उमेदवाराच्या कार्यालयामधून काही दिवसांपूर्वी मोठी रक्कम हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर १० एप्रिल रोजी आयकर विभागाच्या अहवालावर जिल्हा प्रशासनानं डीएमके उमेदवार कातिर आनंद यांच्यासोबत आणखीन दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
निवडणूक आयोगानं यासंबंधी राष्ट्रपतींना शिफारस धाडल्याचं समजतंय. नियमानुसार, लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूक रद्द करण्याचाही अधिकार त्यांनाच असतो. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भरलेला घोडेबाजार उधळून लावण्यासाठी इथली निवडणूक रद्द होऊ शकते.
डीएमके नेते कातिर आनंद ज्येष्ठ नेते दुरई मुरुगन यांचे पुत्र आहेत. सध्या ते वेल्लोर मतदारसंघातून पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहेत. तामिळनाडूच्या सर्व म्हणजेच ३९ मतदारसंघांत १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अशावेळी निवडणूक आयोगाकडून वेल्लोर मतदारसंघाबद्दल लवकरात लवकर निर्णय येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ साठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती आणि प्र....
अधिक वाचा