By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली असून. यातच विदर्भातील नागपुर येथे ज्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री आपला मतदानाचा हक्क बजावतात चक्क त्याच मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे तब्बल तासभर मतदार केंद्रावर लोक खोळंबली होती. धरमपेठ स्कूल इथल्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री मतदान करतात. त्याठिकाणी हा प्रकार घडला. तर दुसरीकडे न्यू इंग्लिश स्कूल इथल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले. मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी सगळ्या मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र या यादीवर भाजपचे खासदार नितिन गडकरीं यांच्या फोटो आणि नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले होते. हे शिक्के कुणी मारले आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे.
चंद्रपूरमध्ये चक्क उमदेवारांने रांग तोडून मतदान केलं... काँग्रेसचे लोकसभ....
अधिक वाचा