By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 05:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उभारण्यात आलेले स्मारक दादर येथे इंदु मिलच्या जागेवर पुतळ्याची उंची ३०० फुट इतकी वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची आधी अडीचशे फुट होती ती आता १०० फुट वाढवून ३०० फुट इतकी केली जाणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान, घेण्यात आलेल्या निर्णयापूर्वी उपमुख्यमंत्री आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी २ जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे प्रश्न सोडवत १४ एप्रिल २०२२ पर्यंत कामकाज पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
स्मारकाचा खर्च वाढेल
इंदु मिलच्या १२५ एकर असलेल्या जागेत बांधण्यात आलेले स्मारक घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे आहे. तसेच भव्य पुतळा उभारण्यात येणार असून खर्चात वाढ होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांनी स्पष्ट केले. स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये इतका प्रस्तावित खर्च आला होता. मात्र, तो आता ९९० कोटीपेक्षा जास्त येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. ऑक्टोंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
सातारा - “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा, जाण....
अधिक वाचा