By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी संध्याकाळी सहापर्यंत सरासरी ६१.३० टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. उन्हाचा कडाका असतानाही पश्चिम महाराष्ट्रात उत्साहात मतदान झाले.
औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा व रत्नागिरी वगळता इतर ६ ठिकाणी मतदानाची टक्केवारी गेल्या वेळपेक्षा बरीच घसरली. सर्वाधिक कमी मतदान पुण्यात ५२ टक्के झाले. ईव्हीएम बिघाडीच्या ६०० वर तक्रारी आल्या. अहमदनगरमध्ये सर्वाधिक ५०० तर कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात ७२ ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने मतदानप्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली. औरंगाबाद, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, मराठवाडा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही यंत्र बिघाडीच्या घटना घडल्या. त्यामुळे सहा वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदार रांगेमध्ये मतदानासाठी ताटकळत उभे होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना), केंद्रीय मंत्री अनंत गीते व माजी मंत्री सुनील तटकरे (रायगड), अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट (पुणे), विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय (अहमदनगर), माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे (रावेर), राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (बारामती), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी (हातकणंगले) यांच्यासह २४९ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणातून शिवसेनेचं नाव घे....
अधिक वाचा