ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'वर्षा'च्या भिंती पुन्हा युतीच्या वादात ?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 07:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'वर्षा'च्या भिंती पुन्हा युतीच्या वादात ?

शहर : मुंबई

          मुंबई - वर्षा बंगला देवेंद्र फडणवीसांनी रिकामा केलाय तर उद्धव ठाकरे अजून 'वर्षा'वर राहायला गेलेले नाहीत. अशातच वर्षा बंगल्याच्या भिंतींवर लिहलेल्या वाक्यांमुळे वाद निर्माण झालाय. या भितींवर 'हू इज यूटी' म्हणजे 'यूटी (उद्धव ठाकरे) कोण आहेत? 'यूटी इज मिन' म्हणजे 'यूटी वाईट आहे' आणि 'शट अप' म्हणजे 'गप्प बस' अशी वाक्य 'वर्षा'च्या भिंतीवर लिहली आहेत. 


      भिंतीवर लिहिल्याचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या संजय राऊत यांनी लिहणाऱ्यांचं 'तोंड काळं झालंय' अशी टीका केलीय. तर 'वर्षा'च्या भिंतींवर लिहून कुणी खोडसाळपणा केलाय का? याची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय.


        नवे मुख्यमंत्री लवकरच 'वर्षा' बंगल्यात राहायला येतील. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा या बंगल्याच्या भिंतींवर ही वाक्य लिहलेली पाहायला मिळाली. वास्तविक पाहता हा फोटो जिथला आहे तिथं हँगर लावलेले आहेत. 


       त्यामुळं ही भिंत 'वर्षा' बंगल्यातल्या आतल्या भागातली असावी, असा अंदाज आहे. यूटी (उद्धव ठाकरे) कोण आहे हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. पण या प्रकरणामुळे भाजप शिवसेनेतली दरी आणखी रुंदावरणार हे मात्र नक्की...
 

मागे

देशभक्तीच्या नावाखाली लोकांना घाबरवले जात आहे - प्रियांका गांधी 
देशभक्तीच्या नावाखाली लोकांना घाबरवले जात आहे - प्रियांका गांधी 

            नवी दिल्ली - काँग्रेसच्या 135 व्या वर्धापनदिनी प्रियांका ....

अधिक वाचा

पुढे  

ठाकरे मंत्रिमंडळाचा आज विस्तार; पहा कोण घेणार शपथ ?
ठाकरे मंत्रिमंडळाचा आज विस्तार; पहा कोण घेणार शपथ ?

       मुंबई - महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मह....

Read more