By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 06:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेने काल लोकसभेत समर्थन दिले. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय, असा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी आम्ही राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन देणार नाही, असे स्पष्ट केले. मी राज्यसभा सदस्यांकडून याची माहिती मागवली आहे. त्यावर विचार करुन अधिकची भूमिका स्पष्ट करेन असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या नव्या विधेयकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय शिवसेना राज्यसभेत मतदान होणार नाही. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेने आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण्यापूर्वी त्यामध्ये सूचवलेल्या सूचनांची दखल घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे, असेही ते म्हणाले होते.
मुंबई - एकनाथ खडसे काँग्रेस पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य का....
अधिक वाचा