By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2021 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
करोनाची रुग्णसंख्या आणि म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरचे उपचार या मुद्द्यांवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यातील करोना रुग्णांच्या आकडेवारीसंदर्भात आपण केलेल्या दाव्यांना राज्य सरकार उत्तर देत नसल्याचं देखील ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत यावेळी करोना आणि म्युकरमायकोसिससंदर्भात राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
करोनाची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. “मी पुराव्यांसहीत कशाप्रकारे करोनाची आकडेवारी लपवली जात आहे हे सांगितलं आहे. माझे पुरावे खरे असून मी सरकारचीच आकडेवारी वापरली आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणी उत्तर देत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
यावेळी फडणवीसांनी म्युकरमायकोसिस रुग्णांना मोफत उपचार मिळण्याची राज्य सरकारने केलेली घोषणा फसवी असल्याचा दावा केला.
पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर सरकारमधून काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण....
अधिक वाचा