ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही' - गडकरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही' - गडकरी

शहर : मुंबई

राज्यामध्ये महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणार आहेत. पण हे सरकार टिकणार नाही, असं भाकित भाजप नेते नितीन गडकरी यांनी वर्तवलं आहे. 'यांच्यामध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेना ज्या विचारधारेवर चालते, त्या विचारधारेचा काँग्रेस विरोध करते आणि काँग्रेसच्या विचाराचा शिवसेना विरोध करते. राष्ट्रवादीही शिवसेनेच्या विचाराशी ताळमेळ ठेवत नाही,' असं गडकरी म्हणाले.

'विचार आणि सिद्धांतावर ही आघाडी झालेली नाही. संधीसाधू असलेली ही आघाडी टिकणार नाही आणि महाराष्ट्रात स्थिर सरकार राहणार नाही. यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होईल. अस्थिर सरकार हे महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही,' असं वक्तव्य गडकरींनी केलं आहे.

'भाजप आणि शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या विचाराने झाली होती. त्यामुळे ही युती देशातली सगळ्यात जास्त काळ टिकली. आजही आमच्या विचारात भिन्नता नाही. त्यामुळे ही युती राहणं हे देशासाठी, विचारधारेचं, हिंदुत्वाचं, महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान आहे,' अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली.

 

 

मागे

वयाच्या ८० व्या वर्षीही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे नेते...
वयाच्या ८० व्या वर्षीही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे नेते...

महाराष्ट्रात पराभूत होऊनही शब्दशः जिंकले आहेत ते शरद पवार. ५० वर्षांहून अध....

अधिक वाचा

पुढे  

भाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे
भाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे

भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख ....

Read more