By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 05:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला असला तरी, मनसेची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधी प्रचार मोहिम जोरात सुरू आहे. अशात राज यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही, तर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे असलेल्या मतदार संघात राज यांची सभा व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जोरदार फिल्डींग चालू आहे. ‘यंदाची निवडणूक ही मोदी विरुद्ध देश असेल’ असा आक्रमक पवित्रा घेत राज यांचा मोदी, भाजपवर घणाघात चालू आहे. भाजप-शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदार संघात मनसेची मते ‘गेमचेंजर’ ठरणार आहेत. प्रत्येक मतदार संघात मनसेची एक ते दीड लाख मते आहेत. ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न चालू आहेत. ‘मनसेचे ईशान्य मुंबई तसेच अन्य मतदार संघात प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज यांना सभा घेण्यासाठी विनंती केली असल्याचे’ राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील म्हणाले. गुरूवारी वरळी येथे काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले.
कोण आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार
ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, कल्याणमधून आनंद परांजपे, नाशिकमधून समीर भुजबळ निवडणूकीसाठी उभे आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेत होळी साजरी केली होती.
शिवसेनेने आधी स्वबळाचा नारा दिला होता. कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाह....
अधिक वाचा