By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल ढासळला. लोकसभा निवडणूकीच्या तारीख जाहिर झाल्यापासून सर्वत्र आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. असे असले तरी अनेकजण आपल्या वक्तव्याची पायरी सोडत आहे. सेनानेते संजय राऊत यांनी मुंबई इथे झालेल्या जाहिरसभेत ’भाड मे गया कानून’ असे कायद्याविरोधात वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
कायदा आमच्यासाठी बनवण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही कायदा हवा तेव्हा बदलू शकतो. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. आचारसंहिता चालू आहे. मात्र जे मनात आहे ते बाहेर नाही आले की श्वास कोंडल्यासारखे होते, असे म्हणत ’भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता’ असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग ठरेल का, तसेच त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बोरिवलीमध्ये उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार सभेदरम्यान भाजपा समर्थका....
अधिक वाचा