ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नक्षलवादाचा धोका कायमचा रोखणार - एकनाथ शिंदे

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 07:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नक्षलवादाचा धोका कायमचा रोखणार - एकनाथ शिंदे

शहर : मुंबई

    नक्षलवादी कारवायांच्या धोक्यापासून राज्यातील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर राज्यातही सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू होणार आहे. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याचे संकेत दिले. राज्यातील नक्षलवादाचा धोक्यापासून नागरिक आणि मालमत्तांचे संरक्षण व्हावे यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू करण्याचा विचार सुरु आहे.

 

       यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लागू होईल. राज्यातील नक्षलग्रस्त भागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा कायदा राज्यात लागू व्हावा अशी मागणी सातत्याने केली जात होती.

 

     सन २००५ मध्ये छत्तीसगडच्या विधानसभेत विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला होता. या कायद्यामुळे पोलिसांना नक्षली कारवायांविरोधात कारवाई करताना विशेष अधिकार दिले जातात. या कायद्यातील तरतुदींनुसार, कायदा-सुव्यवस्थेला अडथळा ठरेल असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना पोलीस ताब्यात घेऊ शकतात.

मागे

पोलिसांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासनाची असेल – उद्धव ठाकरे
पोलिसांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासनाची असेल – उद्धव ठाकरे

       पोलिस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त ....

अधिक वाचा

पुढे  

जळगावात खडसे-फडणवीस-महाजनांची भेट; केवळ जिल्हा परिषद उमेदवारीवर चर्चा?
जळगावात खडसे-फडणवीस-महाजनांची भेट; केवळ जिल्हा परिषद उमेदवारीवर चर्चा?

        जळगाव -  भाजप नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फड....

Read more