By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 06:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : kolkata
मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीचे अनेक खासदार भाजपात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी बोलताना मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आमदार तृणमूल काँग्रस पक्षाला रामराम करतील. आजही 40 आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. दीदी, तुमचं वाचणं कठीण आहे, कारण तुम्ही विश्वासघात केलाय, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.
दगड-माती पासून बनवलेले रसगुल्ले मोदींना खाऊ घालायचे आहेत. असं काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. त्यावर बोलताना मोदी म्हणाले की, वाह.. माझे हे सौभाग्यच आहे. ज्या मातीवर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, चैतन्य महाप्रभू, नेताजी सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या महापुराषांचा जन्म झालेल्या मातीतील रसगुल्ले म्हणजे माझ्यासाठी प्रसादच आहे.
ऐनवेळी समाजवादी पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात उतरवलेला आपला उमे....
अधिक वाचा