By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 01:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील विविध भागातील प्रचार सभेंचा झंजावात सुरू झाला आहे. आज 12 एप्रिल रोजी ते नांदेड येथे राज ठाकरेंची पहिली सभा होणार आहे. काँग्रेसचे नांदेडमधील उमेदवार अशोक चव्हाण यांच्यासाठी सभा होणार असून राज ठाकरे या सभेत काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच ते उदयनराजे, सुप्रिया सुळे, राजू शेट्टी आदींसाठी राज ठाकरे मैदानात उतरले असून 12 ते 19 एप्रिलपर्यंत त्यांच्या सभांचा धूमधडाका चालू राहणार आहे. यावेळी ते एकूण 6 सभा घेणार आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. मात्र मोदी मुक्त भारत करण्याचा असा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसला पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज सभा घेणार आहेत.
कुठे होणार राज ठाकरे यांच्या सभा ठिकाण व वेळ
1) 12 एप्रिल, सायंकाळी 5:30 वाजता, नवीन मुंडा मैदान, नांदेड - उमेदवार अशोक चव्हाण, काँग्रेस
2) 15 एप्रिल, सायंकाळी 5:30 वाजता, कर्णिक नगर क्रीडांगण, सोलापूर - उमेदवार, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस
3) 16 एप्रिल, सायंकाळी 5:30 वाजता, यशोलक्ष्मी मंगल कार्यालय शेजारील मैदान, कोल्हापूर नवीन नाका - उमेदवार राजू शेट्टींसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
4) 17 एप्रिल, सायंकाळी 5:30 वाजता, गांधी मैदान, सातारा, उमेदवार - उदयनराजे, राष्ट्रवादी काँग्रेस
5) 18 एप्रिल, सायंकाळी 5:30 वाजता, शिंदे मैदान, सिंहगड रोड, पुणे - उमेदवार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
6) 19 एप्रिल, सायंकाळी 5:30 वाजता, चांदे मैदान, रायगड - उमेदवार, सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
एनडीए सरकार आल्यावर मला मंत्रीपद तसेच महाराष्ट्रात मंत्रीपद आणि महामंडळ द....
अधिक वाचा