By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 05:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून संपर्क साधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भडकाऊ भाषण बंद करा, अशी तंबी दिली. त्याचबरोबर काश्मीरवरून तणाव निवळावा आणि भारतीय उपखंडात शांतता नांदावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी म्हटले आहे की, भारत पाकिस्तान या दोन देशांनी विविध विषयांवर चर्चेला सुरुवात करावी.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली. काश्मीरच्या मुद्यावर 370 हटवल्यानंतर मोदी यांची पहिल्यांदाच ही चर्चा झाली. व्दिपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय संबंधाबाबतही त्याच्यात चर्चा झाली. मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उचलत पलीकडून होणारा दहशतवाद रोखला पाहिजे, असे म्हटले. दक्षिण आशियातील काही नेत्यांची विधान भारताविरोधात वातावरण तयार करीत असल्याचे सांगत मोदींनी पाक पंतप्रधान यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणासाठी शांतता गरजेची आहे. गरीबी विरोधात लढण्यासाठी जगातील कोणत्याही देशाला सहकार्य करण्याची भारताची तयारी असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितलं.
मोदींबाबत सोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी इम्रान खान यांना फोन लावला आणि भडकाऊ भाषण बंद करा, म्हणत त्यांनी पाकला तंबी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचालनालया....
अधिक वाचा