By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कधीही मदत मागितली नाही, असे स्पष्ट करून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे कश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मदत मागितली होती. असा दावा ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. मात्र भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळल्यानंतर व्हाईट हाऊस कडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ट्रम्प यांचे हे विधान वगळण्यात आले आहे. अमेरिकेच्या दौर्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राम खान यांनी, व्हाईट हाऊस मध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांना कश्मीर प्रश्ना विषयी विचारण्यात आले. तेव्हा ट्रम्प यांनी हे विधान केले होते.
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यां....
अधिक वाचा