By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
लोकसभा निवडणुकीच्या काळात काळ्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाच्या एका पथकाने थेनी जिल्ह्यातील अंडीपट्टीमध्ये एएमएमकेच्या कार्यालयावर काल रात्री छापा टाकला. त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकार्यांच्या पथकात झटापट झाली. पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना अटक केली असून 155 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. या कारवाईत पथकाने 1 कोटी 48 लाख रुपये जप्त केले आहेत. याआधी पथकाने डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. मात्र, तेथे पथकाला काहीही आढळले नाही.
काल सकाळी 9.30 वाजता सुरू करण्यात आलेली कारवाई संध्याकाळी 5.30 वाजता संपली. कारवाईत पथकला 94 पाकिटांमध्ये ठेवलेले 1 कोटी 48 लाख रुपये सापडले. या पाकिटांवर वॉर्ड क्रमांक लिहिला होता. हे सर्व विभाग अंडीपट्टी विधानसभा क्षेत्रात येतात. प्रत्येक मतदाराला 300 रुपये देण्याचा हिशोबही लिहून ठेवण्यात आला आहे. मतदारांना वाटण्यासाठी 16 मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात दोन कोटी रुपये आणल्याचे एका कार्यकर्त्यांने सांगितल्याची माहिती पथकातील अधिकार्याने दिली आहे. पक्षाच्या कार्यालयात पोस्टल बॅलेट पेपरही जप्त करण्यात आले आहे. त्या पेपरवर एएमएमके उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारण्यात आला होता. सर्व बॅलेट पेपर ताब्यात घेऊन ते सील करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकण्यासाठी पथक आले असता पक्ष कार्यकर्त्यांनी पथकाला विरोध केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पथकाशी झटापट करणार्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. 155 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएमएमके हा टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष आहे. पक्ष पेरियाकुलम लोकसभा मतदारसंघासह अंडीपट्टी विधानसभेची जागाही लढवत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान येत्या गुरूवारी होणार आहे.
आर्थिक अरिष्टातील जेट एअरवेजने अवघ्या पाच विमानांसह देशांतर्गत विमानसेवा....
अधिक वाचा