ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपची सत्ता असलेल्या नागपूर पालिकेत तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी बदली

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपची सत्ता असलेल्या नागपूर पालिकेत तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी बदली

शहर : नागपूर

          नागपूर : नागपूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तथापि महाराष्ट्रात नव्याने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी शिस्तप्रिय अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची बदली केली आहे. शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जसे याबाबतीत जसे राजकारण केले होते तसेच राजकारण आता महाविकास आघाडी करीत असल्याची चर्चा होत आहे. 

       तुकाराम मुंढे यांची जेथे जेथे बदली केली गेली तेथे तेथे त्यांनी नियमांवर बोट ठेऊन काम केल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यासाठी त्यांना प्रसंगी बांधकाम व्यावसायिक, वाळू माफिया आणि सत्ताधार्‍यांचा व स्थानिक लोकप्रतींनिधींचा रोष पत्करावा लागला होता. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पाठीशी नागरिक खंबीरपणे उभे राहिल्याचे पहायला मिळाले. अखेर तुकाराम मुंढे यांची बदली तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून करून त्यांचे पंख छाटण्याचे काम केल्याचे म्हंटले जाते. 

    मात्र महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यानंतर ठाकरे सरकारने मुंढे यांची बदली नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी केल्याने तेथे आता भाजप-मुंढे यांच्यात संघर्ष उडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.    

मागे

शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्ती: ही तर गरिबांची थट्टाच 
शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्ती: ही तर गरिबांची थट्टाच 

       मुंबई - येत्या २६ जानेवारीपासून राज्यात १० रुपयात थाळीचा लाभ ही य....

अधिक वाचा

पुढे  

 ‘२४ तास मुंबई’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
‘२४ तास मुंबई’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

         मुंबई - अखेर मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू हो....

Read more