By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र एका रात्रीत बदललं. शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री पदाची शपथ घेत या राजकीय नाट्याला सुरुवात झाली.अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात नक्की काय होणार याबाबत अजूनही चर्चा सुरू आहेत. सरकार सिध्द करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान गेला महिनाभर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरू असताना अचानकपणे आज भाजपनं अजित पवार गटासोबत सत्ता स्थापन केली. दरम्यान कालपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा प्लॅन असताना, दोन पुतण्यांनी ही रणनीती उधळून लावली.
महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पालटलं ते दोन मोठ्या नेत्यांच्या पुतण्यांनी, मुख्य म्हणजे दोघंही राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते. एक शरद पवार यांचे पुतणे अजित पवार तर दुसरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे. या दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या एका चालीमुळे मोठे बदल केले.
चाणाक्याच्या भुमिकेत धनंजय
धनंजय मुंडे हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात परळी विधानसभेत कांटे की टक्कर झाली होती. भावानं बहिणीवर मात करत धनंजय मुंडेनी आमदारकी मिळवली मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंचा प्लॅन सत्ता स्थापनेचा प्लॅनही उद्ध्वस्त केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि अजित पवार गट यांच्यात झालेल्या युतीत धनंजय मुंडे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. शुक्रवारी (22 नोव्हेंबर) सायंकाळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यानंतर सत्ता स्थापनेचा प्लॅन तयार करण्याता आला. विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा 30 हजार मतांनी पराभव केला होता.
दुसरा पुतण्या बनला उप-मुख्यमंत्री
एकीकडे धनंजय मुंडे यांनी सरकार स्थापनेचा प्लॅन केला तर दुसरीकडे शरद पवारांचा पुतण्या अजित पवार यांनी तर भाजपसोब जात उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे, यावर शिक्कामोर्तब झाला. मात्र अजित पवार यांनी आपल्यासोबत 20 आमदार असल्याचे सांगत भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला. अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केले असले तरी शरद पवारांनी त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत त्यांचे विधिमंडळनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीवरुन राज्यपाल भगत सिंह कोश्य....
अधिक वाचा