By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी - तंत्रशिक्षण आणि राज्यातले नवनियुक्त उच्च मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हातल्या पाहिल्याच दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे चित्र दिसले आहे.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होतेच, परंतु नाराजी दूर करण्यासाठी या नेत्यांमध्ये झालेली भेट, नक्की कोणत्या कारणासाठी भेट घेतली असावी ते अध्याप काही समजले नाही.
रत्नागिरीचे दोन राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यात झालेल्या गळा भेटीत या दोन्ही नेते आता एकत्र काम करताना दिसणार आहेत. उदय सामंत यांची रत्नागिरी जिल्ह्यातील नवे सत्ताकेंद्र म्हणून निवड झाली आहे.
मुंबई - ठाकरे सरकारच्या बहुचर्चित खातेवाटपाला अखेर मुहूर्त मिळा....
अधिक वाचा