ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पार्थसाठी उदयनराजे भोसले उतरले मैदानात

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 13, 2019 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पार्थसाठी उदयनराजे भोसले उतरले मैदानात

शहर : मुंबई

मावळ लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झाली असून त्यांच्यासाठी खुद्द उदयनराजे भोसले पार्थचा प्रचार करणार आहेत. आज संध्याकाळी निगडीत ते प्रचार सभा घेणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतरीत झाले आहेत. त्यातील बहुतांश नागरिक हे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात वास्तव्य करत असल्याने या नागरिकांना राष्ट्रवादीकडे आकर्षून घेण्यासाठी उदयनराजेंना येथे आणण्यात आले आहे. ही सभा पिंपरी-चिंचवड प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे होणार आहे. त्यांच्यासोबत स्वतः अजित पवार, शिवेंद्रराजे भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर, शशिकांत शिंदे या नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

मावळ लोकसभेसाठी पार्थ पवार यांचे नाव अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले, तेव्हापासून शहरातील कार्यकर्ते उत्साहात असून त्याचा प्रचार जोमाने करीत आहेत. ही निवडणूक पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची झाल्याचे पाहायला मिळत असून आई सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत स्वतः लक्ष देत पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर वडील अजित पवार यांची मुलगा पार्थचा प्रचार करताना दमछाक होताना दिसत आहे. दरम्यान, उदयनराजेंच्या सभेचा पार्थला कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं आहे.

मागे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाठोपाठ अजून एका नेत्यांच्या सभेची मागणी...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाठोपाठ अजून एका नेत्यांच्या सभेची मागणी...

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांची मागणी राज्....

अधिक वाचा

पुढे  

विनोद तावडेंन उडवली राज ठाकरेंची खिल्ली...
विनोद तावडेंन उडवली राज ठाकरेंची खिल्ली...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत ....

Read more