By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 07:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर काँग्रेसचा विचार सुरु आहे. राज्यातील काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे मत व्यक्त केले आहे. तर दिल्लीतील सूत्रांकडून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नको याबाबत काँग्रेस पेचात सापडली असताना त्यांच्या मदतीला माजी पंतप्रधान आले आहेत.
Janata Dal (Secular) Chief and Former Prime Minister HD Deve Gowda: If Congress gives support to Shiv Sena, they should not disturb it for next 5 years. Then only people will trust Congress. pic.twitter.com/eQY1Tbr1c8
— ANI (@ANI) November 11, 2019
जर काँग्रेस शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असेल तर त्यांनी राज्य सरकार पुढील पाच वर्षासाठी स्थिर राहील याची हमी द्यावी. तरच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील, असा सल्ला माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांनी दिला आहे.
HD Deve Gowda: Balasaheb gave place to BJP in Maharashtra, Advani&Vajpayee went to Bala Saheb's residence & requested him for seats. BJP overrode that, that's why Uddhav Thackeray has taken a stand that he will teach them a lesson. Now, it's for Congress&NCP to put down BJP. https://t.co/jxkXDli1Q2
— ANI (@ANI) November 11, 2019
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्रात स्थान दिले. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी स्वत: बाळासाहेबांकडे गेले होते. त्यांनी बाळासाहेबांकडे जागेची मागणी केली होती. आता भाजपने मर्यादा ओलांडली आहे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी आता भूमिका घेतली आहे आणि ते भाजपला धडा शिकवतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भाजपला खाली खेचण्याची संधी आहे, असे देवेगौडा म्हणाले.
एकीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीने पाठिंब्याचं पत्र आलंच नसल्याने सत्तास्थाप....
अधिक वाचा