ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मी पाहिलेले उद्धव ठाकरे असे नव्हते – फडणवीस

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मी पाहिलेले उद्धव ठाकरे असे नव्हते – फडणवीस

शहर : मुंबई

        मुंबई - भाजपाला सत्तेसाठी कायमचा पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शब्द तरी उद्धव यांनी बाळासाहेबांना दिला होता का?, बाळासाहेबांना ते कदापी आवडले नसते. मी पाहिलेले उद्धव ठाकरे असे नव्हते, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. कोल्हापूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

           यावेळी सुधारित नागरिकत्व कायद्याचे जोरदार समर्थन करून फडणवीसांनी विरोधकांना धारेवर धरले. कायदा न्यायपूर्ण असून त्याने राष्ट्रहित साधले जाणार आहे. यामुळे पोटशूळ उठलेले काही पक्ष अफवा पसरवत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन समाजाचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

            विदर्भात ठाकरे स्वतः लक्ष घालणार आहेत तर पुणे महापालिकेत ५० जागा मिळवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे, अशा प्रकारे शिवसेनेने भाजपविरोधी आक्रमक मोहीम उघडली आहे. याकडे लक्ष वेधले असताना फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटले की, केवळ बोलण्यात आक्रमता नको कृती करून दाखवा.

मागे

भाजपने झारखंड ही गमावले!
भाजपने झारखंड ही गमावले!

       झारखंड विधानसभेच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. पहिल्....

अधिक वाचा

पुढे  

३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

           मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार अस....

Read more