By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2024 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा जनता आहे. त्यामुळे त्या न्यायालयात आम्ही आलोत.
विधानसभा अध्यक्ष यांना सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्ष यांच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. त्यांना सांगितलं पात्र अपात्र ठरवा. त्यांनी काहीच ठोस निर्णय घेतला नाही. आता मिंधे गट कोर्टात गेला आहे. म्हणजे तुमचाही त्यांच्यावर विश्वास नाही. आमचा तर नाहीच नाही. हा अध्यक्ष तुम्ही नेमलेला आहे. राज्यपालांना सांगतो विशेष अधिवेशन बोलवा. त्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. होऊन जाऊ द्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट यांना आव्हान दिले.
महाराष्ट्रात आमचाच व्हीप लागेल. व्हीपचा अर्थ चाबूक. लाचारांच्या हाती शोभत नाही. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांच्या हाती शोभतो असे सांगून ते पुढे म्हणाले. गेल्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला. लबाडाने नाही लवादाने दिला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा जनता आहे. त्यामुळे त्या न्यायालयात आम्ही आलोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशात मतदार हा सरकार ठरवत असतो. कदाचित जगात आपला एकमेव असा देश आहे ज्यांनी जनतेच्या चरणी संविधान अर्पण केलं आहे. सरकार कुणाचंही असले तरी जनता सर्वोच्च असली पाहिजे. हा सूर्य, हा जयद्रथ आहे. आता तरी निकला मिळावा, न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुरावा पुरावा म्हणजे काय हवे आहे? पुरावा की गाडावा. माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावं. पोलीस प्रोटोक्शन घ्यायचं नाही. मी एकही पोलीस घेणार नाही. तिथे नार्वेकर यांनी सांगावं शिवसेना कुणाची. मग जनतेने सांगावं कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा. माझ्यात हिंमत आहे. माझी तयारी आहे असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवसेना तुम्ही विकली असाल पण ती काही विकावू वस्तू नाही. आज इथे शिवसैनिक आहे. आज लाखो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो. ते उच्च न्यायालयात गेले. तिकडेही त्यांना टाइमपास करायचा आहे अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे गटाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या शिवसे....
अधिक वाचा