ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द, 'बळीराजा चेतना योजना' ठाकरे सरकारकडून बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द, 'बळीराजा चेतना योजना' ठाकरे सरकारकडून बंद

शहर : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय बासनात गुंडाळला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेलीबळीराजा चेतना योजनाबंद करण्याचा निर्णय काल घेण्यात आला.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले आहे. त्यामुळे 24 जुलै 2015 रोजी जाहीर करण्यात आलेली ही योजना तातडीने बंद करण्यात येत आहे, असे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने बुधवारी जारी केले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारने या योजनेचा आढावा घेतला, तेव्हा उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात कोणतीही घट झाली नसल्याचे आढळले. ‘टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2001 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्रात 32 हजार 605 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप महायुती सरकारचे नेतृत्व केले त्या काळात, म्हणजे 2015 ते 2018 दरम्यान यापैकी 46% किंवा 14 हजार 989 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.

बळीराजा चेतना योजना काय होती?

बळीराजा चेतना योजनाया 2016 मध्ये अंमलात आलेल्या या योजनेत व्यथित शेतकर्यांना शोधणे, शेतकर्यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणे, त्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवणे आणि कर्जाचे पुनर्गठन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.अडचणीत आलेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, महसूल, वित्त, जलसंपदा आणि महिला बालकल्याण विभागांच्या योजनांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही फडणवीस सरकारने मांडला होता.

सुरुवातीला ही योजना मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ येथे अनुक्रमे 48.9 कोटी आणि 45.7 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरु करण्यात आली. या व्यतिरिक्त, राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील चालू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 7 हजार 183 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकार्यांवर सोपवण्यात आली होती.याआधी, राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी फडणवीस सरकारने केलेली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आली आहे.

मागे

राम मंदिरासाठी मोदी सरकारने केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे- राज ठाकरे
राम मंदिरासाठी मोदी सरकारने केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे- राज ठाकरे

अयोध्येतील राम मदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण नि....

अधिक वाचा

पुढे  

राम मंदिरनंतर काय असेल मोदी सरकारचा पुढचा अजेंडा?
राम मंदिरनंतर काय असेल मोदी सरकारचा पुढचा अजेंडा?

शेकडो वर्षांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि भाजपचा अजेंडा प्रत्यक्षात आणण....

Read more